आठवण


आठवण

राहून राहून आज येते आठवण
त्या दिवसांची मनात आहे
साठवण

दुडू दुडू पळायचं
पडता पडता सावरायचं

दंगा मस्ती करता करता
हळूच खोडी काढायची

दिवसभर हसत बागडत रहायचं
रात्री मात्र शांत पलंगावर
पडायचं

आज धावपळीत हे विसरून गेलो
ते दिवस नाही, फक्त आपणच पुढे
जात राहिलो

राहून राहून आज येते आठवण
त्या दिवसांची मनात आहे
साठवण

शाळेत जातानाचं ते रडणं
पण शाळेत गेल्यावर हरवुन जणं

मित्रांबरोबर ते वेडवाकडं खेळणं
बेभान वासरासारखं पळणं

सुट्टीसाठी आतुर राहणं
पण सुट्टीत मात्र शाळेची आठवण
काढणं

आज धावपळीत हे विसरूनच गेले
होते
ते दिवस नाही, फक्त आपणच पुढे
जात राहिलो

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem