गुलाब – प्रेमाचे प्रतीक


गुलाब - प्रेमाचे प्रतीक

खूप आधीच हेरून ठेवली
होती एक मदमस्त पटाका
रोझ डेची मग वेळ साधली
दिला लाल गुलाब बोलका

नाजुक कोवळ्या त्या बोटांनी
घेतला गुलाब गोड हसतहसत
घायाळलो पार तिच्या बटांनी
पाठमोर्‍या तिला बसलो बघत

प्रेमरुप गुलाब तो लागला फिरू
नोटे सारखा एकमेकांच्या हातून
माझे हृदय जणू पायाखाली चिरडू
काही क्षणातच प्रेम गेले जळून

होती माझ्या मनात जी भरली
तिला होता दुसराच आवडला
दुसऱ्याने होती तिसरीच हेरली
त्या तिसरीला चौथाच सापडला

गुलाब नव्हे भुंगाच होता फिरत
फुलाफुलांवरून असाच गरागरा
तोच गुलाब घेऊन बोलली लाजत
आय लव्ह यू एका दमात भराभरा

विचार पहिलीचा पडला लगेच गळून
पदरात पडली कोणीतरी हाच आनंद
कृत्रिम गुलाब खिशात सरकवून
चाखला कँटीनमध्ये प्रेमाचा गुलकंद
स्नेहा सुनील जाधव

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem