मैत्री


मित्र असावा मित्रा सारखा.....
नको तो नुसता सोबती.....
नको तो नुसते भांडणे.....
त्यात असावा प्रेम जिव्हाळा.....
नको तो नुसता मित्र....[१]

मित्र असावा पाखरा सारखा.....
नको तो नुसता भिर-भिरनारा......
नको तो नुसता चिड-चिडनारा.....
तोच असावा सखा सोबती.....
नको तो नुसता पाखरू....[२]

मित्र असावा जीवा भावाचा....
नको तो नुसता जीव देणारा....
नको तो नुसता प्राण घेणारा....
त्यास असावी भरपूर काळजी...
नको तो नुसता जीव....[३]

मित्र असावा विश्वासातला....
नको तो नुसता राग....
नको तो नुसता द्वेष....
त्यास असावा भरपूर जिव्हाळा....
नको तो नुसता मित्र...[४]

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem