मैत्री


जीवनात खूप मैत्रिणी भेटल्या
काही आठवणीत राहिल्या
तर काही हृदयात
कोणी मनात राहील
तर कोणी डोळ्यात
भांडणं करून पण कधी
ऐकमेंकींवर रुसलो नाही
माहीतच होते मैत्री आहे
कधी तुटणार नाही
जिवापाड असलेली मैत्री
खूप मोलाची असते
शोधून ही कोणाला मिळत नसते
अरे मैत्री करावी लागत नाही
मैत्री होत असते
भावना आहे मैत्री ऐक
जी सर्वांकडे नसते
रक्तातला नाही पण
रक्तातल्या नात्यापेक्षा
खूप आहे
माझी मैत्रीण माझ्या साठी
आकाशातला तारा आहे
हरवलेल्या त्या मैत्रीणी
येईन परत कधी तरी
आनंदाने घातलेले क्षण
पुन्हा आठवू त्या क्षणी.....

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem