लोक काय म्हणतील?


हे विश्व सारं दुनियादारीचं
निभावली तर सर्वांच्याच ह्रदयात असशील
चाखून बघ ते जग एक कप चहा आणि दोन खारीचं
विचार नको करू ह्याचा की लोक काय म्हणतील?

जागव तू सूर्याला
ठणकावून सांग संकटांना
धीर दे स्वतःला
म्हणून दे काय म्हणायचय ते लोकांना

झुंज दे स्वतःच्या हक्कासाठी
जराशी नाळही ठेव मातीशी
लोक काय म्हणतील?
बाळगू नको चिंता उराशी

तयार हो संघर्षासाठी
स्वतःची संकटं स्वतःच पेलून घे खांद्यावर
जिद्द बाळग मनाशी
तू लक्ष देऊ नको लोकांवर

अभिमानाने भरून येऊ दे आता छाती
मग आयुष्यालाही पुरून उरशील
निराशाचं पांघरुण काढून टाक मनातून
विचार करू नको लोक काय म्हणतील?

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem