वाटत ना देशासाठी जगाव…!


वाटत ना देशासाठी जगाव...!
अन्याय होतांना पाहिलं तर खूप राग येतो...
शेवटी अन्यायाबद्दल आवाज उठवायचा म्हटलं तर
आपण मागेच राहतो...
खूप वाटतं या देशासाठी जगाव...
मगं मदतीचा हात पुढे करायला आपण का मागे पुढे
बघाव...
शेवटी वाटत ना देशासाठी जगाव...||१||
खूप वाटत देशातला दहशतवाद नष्ट करावं...
पण लढायचं म्हणलं तर आपण मागे का थांबाव...
खरे आहे ना...
देशभक्त म्हणून घ्यायला आम्हाला फार आनंद होतो...
मगं देशातल्या वाहतूक नियमांना का आळा घालाव...
शेवटी वाटत ना देशासाठी जगाव...||२||
खूप वाटतं देशाच्या हितासाठी काहीतरी कराव...
मगं गरजूंना अन्न द्यायची वेळ आली तेव्हा का मागे
फिरावं...
खूप वाटतं सर्व मानवांच कल्याण व्हावं...
पण वेळ प्रसंगी आपण एकमेकांच्या जीवावर का
उठावं...
शेवटी वाटतं ना देशासाठी जगाव...||३||
खूप वाटतं देशासाठीच शहीद व्हावं...
मगं देशावरच प्रत्येक संकट इतरांवर का सोडावं...
शेवटी वाटत ना देशभक्त व्हाव...
शेवटी वाटत ना देशासाठीच जगावं...||४||

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem