श्रावणमासी हर्ष मानसी
अलगद आलेली वाऱ्याची झुळूक ही,
मनाच्या अंतरंगाला स्पर्श करून जाते
अलवार बहर आलेली ही फुलझाडे,
आतुरतेने श्रवणाचीच तर वाट पाहत होते
ऊन-पावसाच्या खेळात हा,
साकारलेला सप्तरंगी इंद्रधनू
श्रावणसरींची चाहूल लागताच,
सणांची शृंखलाच सुरु
साजरे होई आनंदात रक्षाबंधन, नागपंचमी
सारखे अनेक सण,
ज्यांची वाट पाहत होते
घरातले सगळे जण,
श्रावणसर ही पूर्ण करी
शेतकऱ्यांच्या मनीची आस,
मन साऱ्यांचे प्रफुल्लित करी
तो नारळीभाताचा एकच घास |