समाधानातच आनंद असत…


समाधानातच आनंद असत...

आनंद म्हणजे काय असतं...
वस्तू का अन्न असतं...
प्रत्येक जण आनंदासाठी धडपडत असत...
फक्त काही स्वतःच्या तर काही इतरांच्या
आनंदासाठी...[१]

एके दिवशी कळाले आनंद म्हणजे
समाधान असतं...
वाटलं नव्हतं आपण ज्यासाठी धडपडत असतो
ते समाधानात दडलेल असतं..[२]

आपल्या चेहऱ्यावरचं हसू...
इतरांसाठीचं समाधान असू शकत...
आणि त्याच समाधानात आपला आनंद असतो...
तेव्हा कळालं समाधानातचं आनंद असतं...[३]

दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात,
जेव्हा त्याच्या कष्टाची पिके उगवतात...
आणि ते पाहून त्याला जे अनुभवायला मिळते ते
समाधान असते...
तेव्हा कळालं समाधानातचं आनंद असतं...[४]

आपण एखाद्या गोष्टीत मांडलेले समाधान...
इतरांसाठी आनंद ठरते...
आणि आनंदासाठी धडपडणारा व्यक्ती सुद्धा...
आपल्यासाठी आनंदित होतो...
तेव्हा कळालं समाधानातचं आनंद असतं...[५]

Poem Rating:
Click To Rate This Poem!

Continue Rating Poems


Share This Poem